Advertisement

अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक सेवा बंद

पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेला फटका

अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक सेवा बंद
SHARES

मुंबईत, ठाणे, कल्याण परिसरात मंगळवारी रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मात्र आता या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक  कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका  बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे.

रुळांवर पाणी साचल्याने अंबरनाथ बदलापूर लोकल थांबली असल्याचे एका ट्विटर युझरने म्हटले आहे.



हेही वाचा

मुंबईसह ठाण्यात बुधवारीही मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

पावसामुळे 'या' जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा