Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ
SHARES

पेट्रोल-डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात २९ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३५ पैशांची वाढ झाली आली. मुंबईत आता पेट्रोल ९४.६४ रुपये प्रतिलिटर दराने आणि डिझेल ८५.३२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. 

दिल्लीत एक लिटर पेट्रोल ८८.१४ रुपये झाले असून डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९०.४४ रुपयांना तर डिझेल ८३.५२ रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर ८९.४४ रुपये तर डिझेलचा दर ८१.९६ रुपये झाला आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. पेट्रोलची दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल शंभरी पार करेल अशी अवस्था आहे. रोज वाढणाऱ्या दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे.

तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनू पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल महागल्यामुळे भाजीपाला, अन्नधान्यांच्या किंमतीवरही  परिणाम होत आहे. 



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा