Advertisement

नव्या वर्षात सर्वांसाठी लोकल?

येत्या नव्या वर्षातील पहिला ८ दिवसांत लोकल सर्वांसाठी सुरू होणार असल्याचे संख्येत मिळत आहेत.

नव्या वर्षात सर्वांसाठी लोकल?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाईफलाइन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासन व महापालिकेनं घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव हलका नियंत्रणात येत असल्याचं निदर्शनास आल्यावर व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत, सुरुवातील लोकल सेवा सुरू करण्यात आली. मर्यादित प्रवाशांसाठी धावणारी लोकल आता सर्वसामान्य पुरुष प्रवासी सोडून इतर सर्व प्रवाशांना घेऊन धावत आहे. मात्र, आता येत्या नव्या वर्षातील पहिला ८ दिवसांत लोकल सर्वांसाठी सुरू होणार असल्याचे संख्येत मिळत आहेत.

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार?, हा प्रश्न कळीचा बनला असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. नव्या वर्षात पहिल्या ८ दिवसांत सर्वांसाठी लोकलचे दरवाजे उघडू शकतात, असे स्पष्ट संकेतच वडेट्टीवार यांनी दिले.

नवीन वर्षातील पहिल्या ८ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत', असे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

'सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही रेल्वेकडे प्रस्ताव दिला होता. आम्ही ही परवानगी मागितली तेव्हा रेल्वेने श्रेयासाठी ती परवानगी नाकारली. आमच्या प्रस्तावात अनेक त्रुटी दाखवून तो प्रस्ताव परत पाठवला गेला. तुम्ही सुरक्षा कशी करणार? गर्दी कशी टाळणार? अंतर कसं पाळणार?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले', असे नमूद करत वडेट्टीवार यांनी रेल्वेच्या आडमुठेपणाचा समाचार घेतला.

रेल्वेला हवे तेवढे मनुष्यबळ देण्याची व पाहिजे त्या सुविधा पुरवण्याची आमची तयारी आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वेला केले जाईल, असा विश्वासही दिला.

सध्या महिला, वकील तसेच खासगी सुरक्षा रक्षकांनाही काही अटींसह लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. अशावेळी सर्वांसाठी लोकलसेवा खुली करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मुंबईत दूरच्या उपनगरांतून हजारो प्रवासी दररोज येजा करतात. लोकलअभावी त्यांची प्रचंड प्रवासकोंडी होत आहे.

दररोज ४ ते ५ तास प्रवासात जात आहेत. त्यामुळेच हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून नवीन वर्षारंभी लोकलचे दार सर्वांसाठी उघडल्यास नोकरदारांसाठी ते सर्वांत मोठं गिफ्ट ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा