Advertisement

डिसेंबरपासून मुंबईत 'या' मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार

मंगळवारी कंपनीने तिकिटाच्या किमती जाहीर होणार.

डिसेंबरपासून मुंबईत 'या' मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार
SHARES

इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस, ज्यांना डिसेंबरपासून मुंबईत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मंगळवारी कंपनीने सांगितले की, या वॉटर टॅक्सीचे दैनंदिन प्रवाशांचे भाडे 100 ते 150 रुपये प्रति सीट दरम्यान असेल.

इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय भागीदार सोहेल कझानी यांनी सांगितले की, गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (डीसीटी) ते बेलापूर-जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि डीसीटी ते मांडवा या मार्गांसाठी परवानग्या मिळाल्या आहेत. मांडवा, एलिफंटा या गेटवे ऑफ इंडियासाठी परवानगीची प्रतीक्षा करत आहोत. 

कझानी यांनी जोर दिला की गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर आणि डीसीटी ते बेलापूर आणि इतर मार्गांसाठी, भाडे 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान असेल.

सर्व परवानग्या मिळाल्यावर 14 ते 15 नॉट्सच्या वेगाने चालणाऱ्या 24 प्रवासी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल, बेलापूर, JNPT, एलिफंटा केव्हज आणि मांडवा यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतील.

तीन टप्प्यात पैसे आकारले जातील. निश्चित दैनंदिन प्रवासाचे वेळापत्रक सुरुवातीला 100 ते 150 रुपये प्रति सीट, तासाभराचे भाडे रुपये 4,000 आणि बंदर पर्यटनाचे निश्चित वेळापत्रक 300 रुपये प्रति सीट असेल. 

सेवा प्रदाता सध्या मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांशी चर्चा करण्यात व्यस्त आहेत. 

प्रत्येक नवीन-जनरेशन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी 122 किलोवॅट चार्जिंग क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज असेल, ज्यामुळे विशिष्ट स्थानकांवर 30-मिनिटांच्या जलद रिचार्जची सोय होईल.

64kWh क्षमतेच्या बॅटरीवर चालणाऱ्या, या टॅक्सी चार्ज केल्यानंतर 2-4 तास काम करू शकतात. 



हेही वाचा

एसटी चालकांना स्टेअरिंग हाताळण्यापूर्वी मोबाईल कंडक्टरकडे द्यावा लागणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा