Advertisement

मोबाइलवर बोलताना आढळल्यास ३ महिने लायसन्स रद्द

सर्वाधिक अपघात हे वाहन चालक गाडी चालवताना मोबाइल बोलत असल्यामुळे होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच आरटीओने वाहन चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असल्याचं आढळल्यानंतर त्याचं लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइलवर बोलताना आढळल्यास ३ महिने लायसन्स रद्द
SHARES

मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता चांगलीत कंबर कसली आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून देखील त्यांची सवय सुटत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. मात्र तरीही बेशिस्त वाहन चालक ऐकत नसल्याने वाहन चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलताना आढळ्यास थेट ३ महिन्यांसाठी त्यांचं लायसन्स रद्द करण्याचे आदेश आरटीओने वाहतूक पोलिसांना दिले आहेत.


रस्ते अपघातांत वाढ

मुंबईत बेशिस्त वाहन चालकांमुळे रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ई-चलन नंतर बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. या पुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांकडून संबधित चालकावर भा.द.वि २८३ (सार्वजनिक रस्ते आणि मार्गावर अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जिवास धोका निर्माण) या नुसार गुन्हे नोंदवले जात आहेत. १ आॅक्टोबरपासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली असून पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांवर अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले आहेत.


प्रत्येक मिनिटाला अपघात

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो आणि मोनोच्या कामामुळे आधिच वाहतूकीचा वेग मंदावला असताना. बेशिस्त वाहन चालकांची त्याच भर पडली आहे. याच बेशिस्त वाहनचाकांमुळे रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ४० मिनिटाला एक अपघात होत असल्याचं वाहतूक पोलिसांकडे असलेल्या आकडेवारीतून पुढे आलं आहे.


अपघातांस कारण

यातील सर्वाधिक अपघात हे वाहन चालक गाडी चालवताना मोबाइल बोलत असल्यामुळे होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच आरटीओने वाहन चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असल्याचं आढळल्यानंतर त्याचं लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.हेही वाचा-

म्हणून जेट एअरवेजच्या १० फेऱ्या रद्द

ओला, उबर चालक पोलिसांच्या ताब्यात, मोर्चा गुंडाळलाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा