Advertisement

ओला, उबर चालक पोलिसांच्या ताब्यात, मोर्चा गुंडाळला

ओला, उबर चालक मालकांनी सोमवारी सकाळी १० वाजता काढलेला मोर्चा पोलिसांनी गुंडाळून लावत त्यांना ताब्यात घेतलं आहे. भारतामाता सिनेमा ते विधानभवन असा हा मोर्चा काढण्यात आला होता.

ओला, उबर चालक पोलिसांच्या ताब्यात, मोर्चा गुंडाळला
SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक मालकांनी सोमवारी सकाळी १० वाजता काढलेला मोर्चा पोलिसांनी गुंडाळून लावत त्यांना ताब्यात घेतलं आहे. भारतामाता सिनेमा ते विधानभवन असा हा मोर्चा काढण्यात आला होता.

भारतामाता सिनेमापासून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. तसंच, मोर्चा नेऊ शकत नाही, असं सांगत पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर नेले.


संप दिवाळीपूर्वी सुरू

दिवाळीपूर्वी १२ दिवस सुरू राहिलेला ओला, उबर चालकांचा संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर १५ नोव्हेंबरपर्यंत स्थागित करण्यात आला होता. मागण्यांवर दोन दिवसांत परिवहन विभाग आणि ओला, उबर व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि मराठी कामगार सेनेने दिला होता. मात्र, त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे ओला, उबर टॅक्सी चालक-मालकांच्या संघटनेनं संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.


'या' आहेत प्रमुख मागण्या

  • 'मिनी', 'मायक्रो', 'गो' गाड्यांमध्ये प्रति किमी १२ रुपये, बेस फेअर ५० रुपये व प्रतीक्षा कालावधीचे दोन रुपये मिळावेत
  • 'प्राइम', 'सेडान' प्रति किमी १५ रुपये, बेस फेअर ७५ रुपये व प्रतीक्षा कालावधीचे तीन रुपये मिळावेत
  • 'एक्स एल', 'एक्सयूव्ही' प्रति किमी १९ रुपये, बेस फेअर १०० रुपये व प्रतीक्षा कालावधीचे चार रुपये मिळावेत
  • कंपनीने कमिशन १५ टक्के अाणि कर रद्द करा
  • शेअर, पूल, मायक्रोमध्येही दरवाढ करा

हेही वाचा - 

मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीवर मोर्चा: ओला, उबर चालक-मालकांचा इशारा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा