Advertisement

मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीवर मोर्चा: ओला, उबर चालक-मालकांचा इशारा


मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीवर मोर्चा: ओला, उबर चालक-मालकांचा इशारा
SHARES

गेल्या १० दिवसांपासून ओला, उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप सलग अकराव्या दिवशीही सुरू आहे. अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यांवर अजूनही तोडगा न निघाल्यामुळे गुरुवारी दुपारी यासंदर्भात दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा होणार होती. चर्चेपूर्वीच ओला-उबर व्यवस्थापनाने पळ काढल्याने चर्चा होऊ शकली नाही.

त्यामुळे ओला-उबर चालक मालकांचं संप कायम राहणार आहे. तसंच, या आठवड्यात तोडगा न निघाल्यास सोमवारी भारतमाता सिनेमा ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने दिला आहे.


म्हणून आंदोलनाची दिली हाक

ओला, उबरचे व्यवस्थापन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी रात्री ३ वाजेपर्यंत बैठक झाली. या बैठकीत प्रति किलोमीटर दरात अनुक्रमे १२, १५ आणि १९ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति किलोमीटरमागे आता या कंपन्यांकडून कमिशन आकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर कंपनीने ‘लीज कॅब’ न घेण्याबाबत यांसारख्या ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, इंधन दरवाढीप्रमाणे दरपत्रकात बदल करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी ओला चालक-मालकांनी अांदोलन करण्याचं ठरवलं आहे.


 मागण्यांवर चर्चा नाही

ओला, उबरचे व्यवस्थापन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांध्ये गुरुवारी दुपारी ३ वाजता बैठक होणार होती. मात्र या बैठकीसाठी ओला-उबर व्यवस्थापनेचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे मागण्यांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत या आठवड्यात निर्णय झाला नाही, तर संघातर्फे सोमवारी भारतमाता सिनेमा ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल, असं संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा