वाहतूक कोंडीवर फिरत्या सिग्नलचा उपाय

  Mumbai
  वाहतूक कोंडीवर फिरत्या सिग्नलचा उपाय
  मुंबई  -  


  मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांची वाढती संख्या, अरूंद आणि खरब रस्ते यामुळे ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी फिरत्या सिग्नलचा उपाय शोधला आहे.

  मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात असे 13 पोर्टेबल म्हणजेच फिरते सिग्नल दाखल झाले आहेत. हे सिग्नल अत्यंत सहजतेने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ठेवता येऊ शकतात. इतकेच नाही तर ते अन्य ठिकाणी पाठवता येऊ शकतात.

  या फिरत्या सिग्नलची बॅटरी 8 तास चार्ज करावी लागते. बॅटरी चार्ज झाल्यावर तो सिग्नल 24 तास वापरता येऊ शकतो. मुंबई शहरात वाहतूकीच्या नियमनासाठी सध्या 1200 कायमस्वरूपी सिग्नल आहेत. याशिवाय 13 फिरते सिग्नल उपलब्ध झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक नियमन करणे सोयीचे होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.