Advertisement

पहिल्याच दिवशी मिनी ट्रेन फूल्ल !


पहिल्याच दिवशी मिनी ट्रेन फूल्ल !
SHARES

माथेरानची राणी म्हणून ओळख असलेली मिनी ट्रेन तब्बल 17 महिन्यानंतर सुरू झाली. मिनी ट्रेनचं उद्घाटन रेल्वेची अनेक वर्ष सेवा करणारे आणि मंगळवारी निवृत्त होणारे गॅगमन विक्रम दरोगा यांच्या हस्ते मोठ्या थाटा-माटात करण्यात आलं. त्यानंतर पहिल्याच दिवशी या ट्रेनला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंह यांनी सांगितलं. फक्त 20 मिनिटांत संपूर्ण मिनी ट्रेन भरुन गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

2016 मध्ये दोन अपघातानंतर मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर अखेर ही मिनी ट्रेन सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पहिल्या दिवशी अमन लॉज ते माथेरान अशी ही सेवा सुरू करण्यात आली. यावेळी माथेरान निवासी मोठ्या संख्यलने उपस्थित होते. प्रवाशांमध्ये एवढा उत्साह होता की पहिल्या फेरीच्या वेळी फक्त 20 मिनिटांत माथेरान ते अमन लॉज प्रवासाची बुकिंग फुल्ल झाली होती. ही रेल्वेि प्रारंभ झाल्यािमुळे माथेरान पर्यटनाला जाणा-या हजारों प्रर्यटकांना लाभ मिळेल. 

ए.के.सिंह, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

अमन लॉज ते माथेरान दरम्या्न दरदिवशी 12 शटल सेवा चालवल्या जाणार आहेत. तर, बुधवार आणि गुरूवारी 11 शटल सेवा चालवल्या जाणार असल्याचंही ए. के. सिंह यांनी सांगितलं.


मिनी ट्रेन सुरू झालेल्या पहिल्या दिवशी 960 पासेसची विक्री झाली त्यातून रेल्वे प्रशासनाला 64300 रुपयांचा नफा झाला आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement