मुंबई-कोल्हापूर मार्गावरील 'शिवशाही'च्या वेळेत होणार बदल


SHARE

मुंबई-कोल्हापूर मार्गावर शिवशाहीला उत्तम प्रतिसाद मिळत असताना प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीकोनातून मुंबईतून सुटणाऱ्या शिवशाहीच्या वेळेत बदल करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाकडून पाठवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल येथून रात्री १० ला सुटणारी शिवशाही बस रात्री ८.३० वाजता चालण्यात येईल.खासगी बसचालकांचं धाबं दणाणलं

एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसमुळे खासगी बस चालकांचं धाबं दणाणलं आहे. कोल्हापूर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. यामुळे शहराबाहेरील प्रवाशांना बसची बराच वाट पहावी लागते. त्याचा फायदा खासही लक्झरी बस चालक घेतात. त्यामुळे वेळेत बदल केल्यास प्रवासी संख्या वाढेल आणि याचा फायदा महामंडळाला होईल.

प्रवाशांची देखील हीच मागणी असल्याचं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. कोल्हापूर विभागाच्या या प्रस्तावावर एसटी च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार लवकरच मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल.हेही वाचा - 

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनसडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय