Advertisement

मुंबईकरांना मिळणार वेगवान ४७ एसी लोकल

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ अंतर्गत उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक ४७ वातानुकूलित लोकल प्रवाशांना मिळणार आहेत.

मुंबईकरांना मिळणार वेगवान ४७ एसी लोकल
SHARES

एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण, एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवास आता आणखीनच सुखकर होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ अंतर्गत उपनगरीय रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक ४७ वातानुकूलित लोकल मिळणार आहेत. या लोकलमधील प्रत्येक २ डब्यांच्या मागे एक मोटर असणार आहे. त्यामुळं लोकलचा वेग वाढणार आहे. परिणामी २ लोकलमधील अंतर देखील कमी होणार आहे.  


२ डब्यांमागे एक मोटार

सध्याच्या एसी लोकलमध्ये दर ३ डब्यांमागे एक मोटर असते. मात्र नव्या आधुनिक एसी लोकलमध्ये दर २ डब्यांमागे एक मोटर असेल. यामुळे लोकलचा  वेग पकडण्याची क्षमता प्रचंड वाढणार आहे. सध्या एसी लोकलचे दरवाजे उघडून बंद होण्यास जादा वेळ खर्च होतो. त्यामुळं एक एसी लोकल चालविण्यासाठी वेळापत्रकातील २ साध्या लोकलच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. नव्या ४७ एसी लोकलची वेग पकडण्याची क्षमता जादा असल्यानं वेळापत्रकात गडबड होण्याची शक्यता दूर होणार आहे. २ लोकलमधील अंतर कमी होऊन वेळापत्रकातील इतर लोकलवर परिणाम होणार नाही.


४७ एसी लोकल

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ अंतर्गत उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक ४७ वातानुकूलित लोकल टप्प्या-टप्प्यानं मुंबईकरांना मिळणार आहेत. सुमारे २८९९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यामध्ये १२ डब्यांच्या एकूण ४७ एसी लोकल आहेत. दरम्यान, एसी लोकलच्या कोचचं डिझाईन सोपं करण्याची जबाबदारी अहमदाबादच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’कडं (एनआयडी) देण्याचा विचार करण्यात आला आहे. त्याशिवाय रेल्वेची रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) मार्गदर्शनखाली हे काम करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.हेही वाचा -

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, काँग्रेसच्या ‘न्याय’ला भाजपाचं संकल्पपत्रातून उत्तर

शिवशाहीच्या १० मार्गावरील फेऱ्या होणार बंदसंबंधित विषय