Advertisement

शिवशाहीच्या १० मार्गावरील फेऱ्या होणार बंद

एसटी महामंडळातील वातानुकूलित बस असलेल्या शिवशाहीच्या राज्यातील १० मार्गांवरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे.

शिवशाहीच्या १० मार्गावरील फेऱ्या होणार बंद
SHARES

एसटी महामंडळातील वातानुकूलित बस असलेल्या शिवशाहीच्या राज्यातील १० मार्गांवरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे. राज्यातील १० मार्गावर बंद करण्यात आलेल्या मार्गांपैकी ७ मार्ग हे मुंबईहून सुटणाऱ्या फेऱ्यांचे आहेत. त्यामुळं या मार्गांवर शिवशाहीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 


दुष्काळग्रस्त भागातील फेऱ्या

एसटीच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील काही शिवशाही (स्लीपर) गाड्या सेवेतून कमी होत आहेत. त्यामुळं 'एप्रिल महिन्यातील ज्या शेवटच्या दिवसांचे आगाऊ आरक्षण झालेलं असेल, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनची फेरी आगाऊ आरक्षणासाठी त्वरीत बंद करावी. गर्दीचा हंगाम सुरू असल्यानं तातडीनं ही कार्यवाही पूर्ण करावी', असे लेखी आदेश वाहतूकविभागाच्या महाव्यवस्थापकांनी ४ एप्रिल रोजी दिले होते. 

महाव्यवस्थापकांनी दिलेल्या आदेशानुसार, ६ एप्रिल रोजी मुंबईहून सुटणाऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्याशिवाय, बाकीच्या फेऱ्या टप्प्या-टप्प्यानं बंद करण्यात येणार असल्याचं समजतं आहे. दरम्यान, बंद करण्यात आलेल्या १० मार्गावरील काही फेऱ्या दुष्काळग्रस्त भागातील आहेत. एसी शिवशाहीचं भाडं जास्त असल्यामुळं या मार्गावरील फेऱ्या बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


मुंबईतील 'या' फेऱ्या होणार बंद 

बोरिवली-उदगीर (उदगीर-मुंबई), मुंबई-लातूर (लातूर-मुंबई), मुंबई-अक्कलकोट (अक्कलकोट-मुंबई), बोरिवली-उमरगा (उमरगा-बोरिवली), मुंबई-उस्मानाबाद (उस्मानाबाद-मुंबई), मुंबई-मेहकर (मेहकर-मुंबई), मुंबई-परळी (परळी-मुंबई) या फेऱ्या बंद होणार आहेत. हेही वाचा -

मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट? २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

टीव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, काँग्रेस करणार तक्रारRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement