मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट? २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबईकरांना पाणी जपून वापरा, कारण या वर्षीही अपुऱ्या जलसाठ्यामुळं मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता आहे.

SHARE

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई किंवा पाणीकपातीचं संकट असे शब्द सर्वांच्याच परिचयाचं झाले आहेत. दरवर्षी या ना त्या कारणानं मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागतं. या वर्षीही अपुऱ्या जलसाठ्यामुळं मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता आहे.


२७ टक्के पाणीसाठा

मुंबईला भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि अप्पर वैतरणा अशा ७ धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांच्या पाणी पातळीत घट झाली असून त्यात केवळ २७ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यानंतर पावसानं पाठ फिरवली होती. त्यामुळं जलसाठ्यांमध्ये ९१ टक्के पाणी जमा झालं होतं. 

वर्षाअखेरीस जलसाठ्यांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष पाणीसाठी तलावांमध्ये असणं आवश्यक आहे. अशातच आवश्यक पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यानं मुंबईतही गेल्या २ महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचं दिसत आहे.


बाष्पीभवनाचा परिणाम

तसंच बाष्पीभवनामुळं पाण्याच्या साठ्यातही घट होत असते. त्यामुळं ही तफावत वाढत गेल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत तलावांमध्ये ४० टक्के पाणीसाठी शिल्लक होता. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अपुरा पाणीसाठा असल्यामुळं आता मे महिन्यात काय परिस्थिती ओढावेल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -

Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार

रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची मदतसंबंधित विषय
ताज्या बातम्या