Advertisement

गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

काही लोकल गाड्या रद्द; वाचा सविस्तर

गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
SHARES

अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वे 19 डिसेंबरच्या मध्यरात्री 1.10 ते बुधवारी (20 डिसेंबर) पहाटे 4:40 पर्यंत ब्लॉक घेणार आहे.

त्यामुळे हार्बर मार्गावरील अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेवर अप-डाऊन धिम्या-जलद मार्गासह पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी लवकर सुटणाऱ्या आठ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी रात्रीच्या रद्द लोकल

रात्री 10.18 ची विरार-अंधेरी लोकल

वसई रोड-अंधेरी लोकल रात्री 11.15 वाजता

चर्चगेट-विलेपार्ले लोकल मध्यरात्री 12:31 वाजता

बुधवारी सकाळच्या रद्द लोकल

पहाटे 4.25 ची अंधेरी-विरार लोकल

वांद्रे-बोरिवली लोकल पहाटे 4:05 ची

पहाटे 4:53 ची बोरिवली-चर्चगेट लोकल

पहाटे 4:40 ची अंधेरी-विरार लोकल

पहाटे 4:05 ची अंधेरी-चर्चगेट लोकल


बुधवारी लोकल उशिराने धावल्या

विरार-चर्चगेट: पहाटे 3:25(15 मिनिटे)

बोरिवली-चर्चगेट: पहाटे 4:05 (15 मिनिटे)

विरार-बोरिवली: पहाटे 3:35(10 मिनिटे)



हेही वाचा

विरार स्टेशनवर 'या' 'ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा