मुंबईत 'टॅक्सी' वॉर !

मुंबई - काळी-पिवळी टॅक्सी आणि ओला उबेरमधील व्यवसायिक संघर्ष आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. त्याला निमित्त आहे ते ग्राहक पंचायतने केलेल्या एका सर्वेचं ! या सर्वेत 76 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्वेनुसार तब्बल 80 टक्के लोकांनी ओला उबेरलाच पसंती दिलीये. टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मुजोरी, भाडं नाकारणं अशा कारणाने आता मुंबईकर वैतागलाय. त्यामुळे एका फोन कॉलवर किंवा मोबाइल अॅपवर उपलब्ध होणारी ओला उबेरसारखी टॅक्सी सिस्टीम मुंबईकराना सोयीची वाटतेय... त्याला कारणही तसंच आहे.मात्र ग्राहक पंचायतीचा हा दावा चुकीचा असल्याचं मुंबई टॅक्सीमेन संघटनेनं म्हटलंय.दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे होत असले तरी, ओला उबेर आणि टॅक्सी संघटनेच्या या चढाओढीत प्रवाशांचा काही फायदा होणार का? हेच आता पाहावं लागणार आहे.

 

Loading Comments