मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (mmrda) 'दहिसर-मीरा (mira road) -भाईंदर मेट्रो 9' आणि 'अंधेरी (andheri) पूर्व-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 7A' मार्गांचे बांधकाम सुरू आहे.
या दोन्ही प्रकल्पांना विलंब होत आहे. तसेच या प्रकल्पांसाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. या मार्गांच्या कंत्राटदारांना ही मुदतवाढ मिळाली आहे.
यामुळे मेट्रो 9 जून 2025 आणि मेट्रो 7A जुलै 2026 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी, मुंबईकरांना या वाहतूक सेवांचा लाभ घेण्यासाठी जास्त वाट पहावी लागणार आहे.
दहिसर (dahisar) ते मीरा-भाईंदर (bhayandar) हा मेट्रो 9 (metro 9) मार्ग जो पुढे उत्तनपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. त्याचे 92% काम पूर्ण झाले आहे.
तर दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो 7 मार्गिकेचा गुंडवली, अंधेरी पूर्व ते आंतरराष्ट्रीय विमानतळ असा विस्तार मेट्रो 7 अ (metro 7a) मार्गिके अंतर्गत केला जात आहे. 3.442 किमीच्या या मार्गिकेचे सध्या 46 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या दोन्ही मार्गिकांच्या कामासाठीचे कार्यादेश 9 सप्टेंबर 2019 मध्ये देण्यात आले होते. मेट्रो 9 च्या कामाची अंतिम मुदत 8 सप्टेंबर 2022 अशी होती. मात्र कामास विलंब झाल्याने या कामासाठी कंत्राटदारास जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तथापि, विलंबामुळे वेळेत बदल करण्यात आले आहेत, मेट्रो 9 आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे लक्ष्य आहे, जे या वर्षाच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.
या वर्षात वा 2026 च्या सुरुवातीला या मार्गिकेतील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करावयाचे झाल्यास एमएमआरडीएकडून मेट्रो 7 च्या कारशेडचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्यामुळे येत्या काही महिन्यात मेट्रो 9 चा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पण संपूर्ण मार्गिकेवरुन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा