Advertisement

मुंबई पोलिसांची बेकायदेशीर नायलॉन मांजावर कारवाई

धोकादायक असल्याने बंदी असूनही, नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी येतच आहे.

मुंबई पोलिसांची बेकायदेशीर नायलॉन मांजावर कारवाई
SHARES

मकर संक्रांतीच्या (makarsankranti) काळात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई (mumbai) पोलिसांनी पतंग उडवण्यासाठी (kite flying) वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर नायलॉन (nylon) मांजाच्या विक्री आणि वापराविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली.

10 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत 19 गुन्हे दाखल झाले.

बंदी असूनही नायलॉन मांजा (manja) बाजारात विकण्यासाठी येतच आहे. तसेच याच्या वापरामुळे गंभीर धोका निर्माण होत आहे. या मांजामुळे नागरिकांना दुखापत होते आणि दरवर्षी शेकडो पक्ष्यांना हानी पोहोचते.

या मांजाच्या गुप्त विक्रीबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापे टाकून 35,350 रुपये किमतीचे नायलॉन मांजा आणि संबंधित साहित्य जप्त केले.

यासंबंधी 19 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदेशीररित्या मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा

वाशी मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी दाखल

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी "या" चौकाचे नूतनीकरण होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा