Advertisement

मुंबईकरांसाठी जानेवारीत दाखल होणार पहिले रो-रो जहाज

रो-रो जहाज प्रवासी, कार आणि बस यांना घेऊन समुद्र मार्गानं मुंबई ते नवी मुंबई अशी वाहतूक करणार आहे.

मुंबईकरांसाठी जानेवारीत दाखल होणार पहिले रो-रो जहाज
SHARES

मुंबईला वाहतुकीसाठी एक नवीन माध्यम उपलब्ध होत आहे. जानेवारीच्या शेवटी मुंबईला पहिले रो-रो जहाज मिळणार आहे. २८ जानेवारीला रो रो जहाज दाखल होऊ शकतं. हे जहाज प्रवासी, कार आणि बस यांना घेऊन समुद्र मार्गानं मुंबई ते नवी मुंबई अशी वाहतूक करणार आहे.

किती प्रवासी? 

मुंबईचे हे पहिले रो-रो जहाज, डिसेंबरच्या अखेरीस कार्यान्वित होणे अपेक्षित होते. परंतु ग्रीसकडून येण्यास विलंब झाल्यानं आता हे जहाज जानेवारीच्या शेवटी मुंबईत दाखल होईल. या जहाजाची क्षमता अफलातून आहे. या जहाजाची नियमित दिवसांमध्ये प्रवासी क्षमता सुमारे १००० असेल. तर खराब हवामानाच्या परिस्थितीत हे जहाज ५०० प्रवासी घेऊन जाण्यास सक्षम असेल. या जहाजातून एकाच वेळी बर्‍याच बसेस आणि २०० पेक्षा जास्त मोटारी देखील नेल्या जाऊ शकतात

कुठल्या मार्गावर चालणार?

रो-रो जहाज सुरू झाल्यावर, बालाजी मंदिर- नेरूळ, डी वाय पाटील स्टेडियम, वंडर पार्क आणि ठाणे खाडी या ठिकाणी जाण्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या दरम्यानही रो-रो वाहतूक सेवा सुरू होणार आहे. हे जहाज मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर मार्चपूर्वी ही सेवा सुरू करण्यात येईल, असं मुंबई पोर्ट ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, १८ लोकल फेऱ्या रद्द

दादर ते केईएम नवी बेस्टसेवा, प्रवाशांना दिलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा