Advertisement

मुंबईची मेट्रो लाईन 2A आणि 7 वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता

मुंबईची मेट्रो लाइन 2A आणि 7 ची डिझाइन आणि मानकांची चाचणी पूर्ण केली आहे.

मुंबईची मेट्रो लाईन 2A आणि 7 वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता
SHARES

'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्ग लवकरच खुला होणार आहे. मेट्रोच्या या दोन्ही मार्गिकेसाठी ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) दर्जाविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. आता सिग्नलिंगसाठी चाचणी घेतली जाईल, असे MMRDA अधिकाऱ्याने सांगितले.

“RDSO चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाणपत्र दिले जाईल. आता उर्वरित सुरक्षा मंजुरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. जेणेकरून या वर्षाच्या अखेरीस मेट्रोचा हा टप्पा देखील सुरू करणे शक्य होईल, ” अशी माहिती अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला दिली.

कोणताही मेट्रो रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी RDSO मंजुरी ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे.

कुलाबा-वांद्रे-सीपझेड दरम्यानची भूमिगत लाईन 3 वगळता एमएमआरमधील मेट्रो लाईन 2A आणि 7 च्या बांधकामासाठी नोडल एजन्सी असलेली MMRDA, फक्त आरे आणि धनुकरवाडी दरम्यानचा 20 किमीचा पट्टा महामुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडला (MMMOCL) देण्यास सक्षम आहे.

अर्धवट उघडलेल्या मेट्रो लाईन 2A आणि 7 ला देखील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्याने दरमहा सरासरी आठ लाख प्रवासी संख्या नोंदवली आहे.

व्यस्त लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणार्‍या 30 स्थानकांचा समावेश असलेल्या या दोन मेट्रो मार्गांमुळे वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा आहे.

'मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार

'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.हेही वाचा

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे 118 बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत

लक्ष द्या! मुंबईत ऑटो, टॅक्सीच्या भाड्यात 'इतकी' वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा