Advertisement

कारमध्ये मागे बसताना सीट बेल्ट जरूर लावा, नाहीतर...


कारमध्ये मागे बसताना सीट बेल्ट जरूर लावा, नाहीतर...
SHARES

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून कारमधून प्रवास करत असाल तर, चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीलासुद्धा सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल. नाहीतर दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार आहे. उर्से टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.


म्हणून सीटबेल्ट बंधनकार

पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करावा लागतो. या द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना गाड्यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अपघातांचं वाढत असलेलं प्रमाण रोखण्यासाठी महामार्ग पोलिस विविध उपाययोजना राबवत आहेत. त्यादृष्टीने आता चालकाप्रमाणेच मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं अनिवार्य असेल.


200 रूपये दंड

जर चालकामागील प्रवाशानं सीट बेल्ट लावला नसल्यास त्याच्याकडून 200 रूपये दंड अकारला जाणार आहे. वाहतूक विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सर्वाधिक संख्या असलेल्या टुरिस्ट वाहनांना लक्ष्य केलं जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा