Advertisement

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना मिळणार आर्थिक बळ

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३,५०० कोटी रुपयांचं आर्थिक बळ मिळणार आहे.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना मिळणार आर्थिक बळ
SHARES

एमआरव्हीसीकडून मध्य व पश्चिम रेल्वेवर एमयूटीपीअंतर्गत (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) विविध प्रकल्प राबविले जात आहेत. एमयूटीपी-३ ला डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली आहे. परंतु, निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, आता एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३,५०० कोटी रुपयांचं आर्थिक बळ मिळणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि कर्जपुरवठा करणाऱ्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक (एआयबी) यांच्यात प्रकल्पांसाठी निधी देण्याबाबत बैठक सुरू होत्या. या बैठक यशस्वी ठरल्या आहेत. तसंच, बँकेनंही सहमती दर्शवली आहे.


चर्चा निष्फळ

एमयूटीपी-३ या प्रकल्पामध्ये ४७ एसी लोकल, पश्चिम व मध्य रेल्वेवर २ स्थानकांत रुळ ओलांडण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना, विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल-कर्जत दुहेरीकरण व ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांकरीता कर्ज मिळवण्यासाठी जागतिक बँकेबरोबर चर्चा होत होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली असून कर्ज देणाऱ्या जागतिक बँकेनं माघार घेतली होती.


दुसऱ्या बँकांशी चर्चा

एमआरव्हीसीनं दुसऱ्या बँकांशी चर्चा सुरू केली. ,५०० हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँकेबरोबर बोलणी सुरू होती आणि बँकेने कर्ज देण्यासाठी सहमतीही दर्शवली. मात्र, कर्जासाठी ३ प्रकल्पांतील ५० टक्के भूसंपादन करा, नंतरच कर्ज मिळेल, अशी अट बँकेनं ठेवली आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीत भूसंपादन सुरू आहे.  


कर्ज देण्यास सहमती

दरम्यान, ही कामे वेळेतच पूर्ण होणार असल्याचं एमआरव्हीसीनं बँकेला पटवून दिलं. तसंच, विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरीकरण या प्रकल्पांसाठी आधी काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं दुसऱ्यांदा निविदा लवकरच काढा, अशीही अट बँकेनं घातली आहे. याबद्दल एमआरव्हीसीने दिलेले आश्वासन व अन्य तांत्रिक मुद्द्यांवर यशस्वी झालेल्या चर्चेअंती एआयबीने कर्ज देण्यास सहमती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे.


एमयूटीपी-३ प्रकल्प

  • विरार ते डहाणू चौपदरीकरण - ३ हजार ५७८ कोटी रुपये
  • पनवेल ते कर्जत दुहेरीकरण - २ हजार ७८३ कोटी रुपये
  • ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग - ४७६ कोटी रुपये
  • ४७ वातानुकूलित लोकल- ३ हजार ४९१ कोटी रुपये
  • रूळ ओलांडणे रोखण्यासाठी उपाययोजना - ५५१ कोटी रुपये
  • अन्य तांत्रिक कामे - ६९ कोटी रुपये


हेही वाचा -

मुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्रRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा