मुंबईला येणारं विमान धावपट्टीवर घसरलं, प्रवासी सुखरूप

 Pali Hill

See all

मुंबई - जेट एअरवेजचं गोवा-मुंबई विमान दाबोलीम विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी पहाटे घसरलं. मात्र, सुदैवानं हे विमान वेळेत थांबवता आल्यानं मोठा अपघात टळला. 9W 2374 क्रमांकाचं हे विमान पहाटे 5 वाजता गोव्याहून मुंबईकडे निघालं असताना हा प्रकार झाला. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात विमानतळ कर्मचारी आणि नौसैनिकांना यश मिळालं. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती जेट एअरवेजने दिली आहे.

तांत्रिक कारणांमुळे विमान घसरल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर दाबोलीम विमानतळ 27 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. या विमानात 154 प्रवासी आणि 7 कर्मचारी होते.

Loading Comments