Advertisement

नवी मुंबईहून धावणाऱ्या मेट्रोच्या वेळेत ‘हे’ नवीन बदल

सोमवार (आज) पासून मेट्रो वाढवलेल्या वेळेनुसार धावणार आहे.

नवी मुंबईहून धावणाऱ्या मेट्रोच्या वेळेत ‘हे’ नवीन बदल
SHARES

मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे. सोमवारपासून मेट्रो विस्तारित वेळेनुसार धावणार आहे. सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने शुक्रवारी सायंकाळी विस्तारित वेळेनुसार बेलापूर मेट्रो स्थानकातून एक तास आणि पेंदर मेट्रो स्थानकातून अर्ध्या तासाने टायमिंग वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

17 नोव्हेंबर 2023 मध्ये नवी मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग बेलापूर स्थानक ते पेंदरपर्यंत धावला. शेवटची मेट्रो रात्री दहा वाजेपर्यंत धावत असल्याने हार्बरमार्गे तळोजा येथे येणाऱ्या प्रवाशांना खारघर रेल्वे स्थानकाबाहेरून खासगी रिक्षा किंवा इको व्हॅनने प्रवास करावा लागत असे. परिसरात अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री प्रवास करणे धोक्याचे होते. गेल्या साडेचार महिन्यांत साडेचार लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे.

सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे प्रवाशांच्यावतीने आणखी वेळ मागितला असता, त्यांनी तातडीने त्यास होकार दिला. आता रात्री अकरा वाजेपर्यंत बेलापूर ते पेंदर मार्गावर प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. 

प्रवासी भाडे कमी करण्याच्या मेट्रो प्रवाशांच्या मागणीवर सिडकोने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. नव्या वेळापत्रकानुसार बेलापूर मेट्रो स्थानकातून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवेच्या वेळेत एक तासाने तर पेंदर मेट्रो स्थानकातून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवेच्या वेळेत अर्ध्या तासाने वाढ करण्यात येणार आहे. मेट्रो आठवड्यातील सर्व दिवस विस्तारित सेवा वेळेनुसार धावेल.

नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंदर विभागाच्या सेवेच्या वेळा वाढविल्यानंतर, पहिली मेट्रो बेलापूर मेट्रो स्टेशनवरून पेंदरच्या दिशेने आणि पेंडरहून बेलापूरच्या दिशेने सकाळी 6 वाजता सुटेल. बेलापूर मेट्रो स्थानकातून शेवटची मेट्रो रात्री 11 वाजता पेंदरसाठी सुटेल, तर पेंदर मेट्रो स्थानकातून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता बेलापूरसाठी सुटेल.



हेही वाचा

ठाणे-दिवा आणि GTB-चुनाभट्टी स्थानकांवर दोन नवीन फूट ओव्हर ब्रिज सुरू

रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यात येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा