Advertisement

रेल्वेचं दिवाळी गिफ्ट- १२ नोव्हेंबरपासून नेरूळ-खारकोपर मार्ग सेवेत


रेल्वेचं दिवाळी गिफ्ट- १२ नोव्हेंबरपासून नेरूळ-खारकोपर मार्ग सेवेत
SHARES

नवी मुंबई आणि उरण शहर एकमेकांशी रेल्वे वाहतुकीनं जोडत हार्बर प्रवास सुकर करण्यासाठी नेरूळ ते उरण असा २७ किमीचा रेल्वे मार्ग बांधण्यात येत आहे. यातील नेरूळ ते खारकोपर या १२ किमीच्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झाली असून नुकतीच या मार्गावर लोकलची चाचणीही घेण्यात आली होती. त्यामुळं आता हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबरला या मार्गाचं उद्घाटन करत हा मार्ग १२ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गावर ४० लोकल फेऱ्या होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.


मार्गाचं काम पूर्ण

हार्बर रेल्वे वाहतूक सेवा मजबूत करण्यासाठी नेरूळ-उरण रेल्वे मार्ग बांधण्याचा निर्णय १९९७ मध्येच रेल्वेनं घेतला होता. आता २०१८ मध्ये हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. २७ किमीच्या नेरूळ-उरण मार्गातील १२ किमीचं अर्थात नेरूळ-खारकोपर मार्गाचं काम नुकतचं पूर्ण झालं आहे.


चाचणी फसली

सिडकोनं या मार्गाचं काम केलं असून मध्य रेल्वेकडून १५ दिवसांपूर्वी या मार्गावर चाचणी घेण्यात आली. मात्र प्लॅटफार्म आणि रूळांमध्ये कमी अंतर असल्यानं लोकल अक्षरश: प्लॅटफाॅर्मला घासत पुढं गेली नि लोकलची चाचणी फसली. तर यावरून रेल्वेवर आणि सिडकोवर मोठी टीकाही झाली. अस असलं तरी आता मात्र नेरूळ ते खारकोपर रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

११ नोव्हेंबरला या मार्गाच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा रंगणार आहे. तर त्यानंतर, १२ नोव्हेंबरला हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार आहे.



हेही वाचा-

नेरूळ ते खारकोपर रेल्वेच्या चाचणीदरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मला घासत गेली पुढे

उरण रेल्वे काॅरिडाॅरच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा दिवाळीत सुरू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा