Advertisement

भाईंदर स्थानकात बांधणार नवा पादचारी पुल


भाईंदर स्थानकात बांधणार नवा पादचारी पुल
SHARES

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या स्थानकात उत्तरेला जाणारा जुना पूल काढून त्या ठिकाणी 10 मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल लवकरच बांधण्यात येईल.


10 मीटर रुंदीचा पुल बांधणार

भाईंदर स्थानकात सध्या अडीच मीटर अरुंद जुना पादचारी पूल आहे. त्या जागी पश्चिम रेल्वे प्रशासनाने 10 मीटर रुंद पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा पादचारी पूल भाईंदर स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मला जोडण्यात येईल. या पुलासाठी 7 नोव्हेंबरला जवळपास 5 कोटी 64 लाख रुपयांचं टेंडर काढण्यात आलं होतं.


जुना पुल बुधवारपासून बंद

दरम्यान, पश्चिम रेल्वेला मेसर्स गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्स या कंपनीकडून 14 नोव्हेंबर रोजी टेंडरला मंजुरी देण्यात आली. मंजुरी दिल्यानंतर भाईंदर स्थानकातील जुना पुल बुधवारपासून बंद करण्यात आला. हा पूल सहा महिन्यात पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले आहे.



हेही वाचा

पश्चिम रेल्वे स्थानकांवर नवे १२ पादचारी पूल, १७ पुलांची पुनर्बांधणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा