Advertisement

'या' १९ देशांतून येणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड १९ च्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

'या' १९ देशांतून येणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर
SHARES

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड १९ च्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. परदेशातील ज्या देशांमध्ये कोरोनाचा धोका कायम राहिला आहे, अशा देशांतून येणाऱ्यांसाठी ही नवी नियमावली असणार आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या यादीतील ज्या देशातून नागरिक येणार त्यांची विमानतळावरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामध्ये तो प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला तर पुढील चाचणीसाठी त्यांचे रिपोर्ट पाठवले जाणार आहेत. त्यानंतर सरकारच्या नियमानुसार त्यांना आयसोलेट केले जाणार आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्टँडर्ड प्रोटोकॉल लागू केला जाणार आहे. २२ जानेवारीपासून कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आयसोलेशन सुविधा सक्तीची नसणार आहे.

याआधी ७ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये आयसोलेशनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली होती. तसंच त्यांच्यावर सरकारने लागू केलेल्या नियमांचीही सक्ती करण्यात आली होती.

कोरोनाबाबतच्या नवी नियमावली शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होणार आहे. याआधी ११ जानेवारीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती. या नियमावलीसारखे पुढील नियमावली जाहीर होईपर्यंत हे नियम लागू केले जाणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या आदेशमध्य म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीनुसार ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये होम आयसोलेशन लागू करण्यात आले आहे.

सद्य परिस्थितीत जगातील एकूण १९ देश करोनामुळे संकटग्रस्त आहेत. यामध्ये ब्रिटिनबरोबर युरोपमधीलही काही देशांचा समावेश आहे. या १९ देशांतून येणाऱ्यांना समान नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्स्वाना, चीन, घाना, मॉरिशियस, न्यूझिलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हॉंगकॉंग, इज्रराईल, कांगो, इथियोपिया, कजाकिस्तान, केनिया, नायझेरिया, ट्यूनिशिया या देशांचा समावेश १९ देशांच्या यादीत केला गेला आहे.

मार्च २०२० मध्ये पहिल्या लॉकडाऊनंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात होती. त्यानंतर मागील वर्षी १५ डिसेंबरला ही बंदी उठवण्यात येणार होती. मात्र ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या निर्णयाबाबतचा निर्णय २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.हेही वाचा

ताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा