बहुप्रतिक्षित मेट्रो 3 च्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी याबाबतची माहिती दिलीय. कुलाबा-वांद्रे-सिप्झ असं या मेट्रोचा प्रवास असेल. 33.5 किमीचा भुयारी मेट्रो मार्ग बांधण्यासाठी सात पॅकेजमध्ये पाच कंत्राटदारांना बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. 18 हजार 114 कोटी 9 लाखांचे हे कंत्राट आहे. पाचपैकी चार कंत्राटदारांशी बुधवारी करार करण्यात आला. उर्वरित एका कंपनीशी करार करणं बाकी आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचंही भिडे यांनी स्पष्ट केलं.