कोकण रेल्वेचे नवे पावसाळी वेळापत्रक

 Mumbai
कोकण रेल्वेचे नवे पावसाळी वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर दर पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज होत आहे. अतिवृष्टीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करुन गाड्यांचा वेग (ताशी 70 ते 75 किमी) देखील कमी करते. त्यानुसार यंदाही 10 जूनपासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग अतिवृष्टी कालावधीत कमी ठेवण्यात येणार असून, प्रशासनाने 10 जून ते 30 सप्टेंबरपर्यंतचे नवे पावसाळी वेळापत्रकही सादर केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील नवीन वेळापत्रक :

 • 10112 मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी येथून साय. 6.15 ऐवजी सायंकाळी 7.36 वाजता सुटेल
 • 11004 दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी सुटणारी गाडी 5.30 ऐवजी 6.50 वाजता सुटेल
 • 10104 मांडवी एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी 10.06 ऐवजी 10.45 वाजता सुटेल
 • 50106 दिवा पॅसेंजर ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी 8.30 वाजता सुटेल
 • 12617 एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस ही गाडी कणकवली येथून दुपारी 3.32 ऐवजी संध्याकाळी 5.42 वाजता सुटेल
 • 12052 मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी कुडाळ येथून दुपारी 1.54 ऐवजी दुपारी 3.48 वाजता सुटेल
 • 12620 मेंगलोर-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही गाडी रात्री 11.56 ऐवजी रात्री 8.41 वाजता सुटेल
 • 12134 मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी कणकवली येथून रात्री 11.56 ऐवजी रात्री 8.41 वाजता सुटेल
 • 16346 नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी कुडाळ येथून सकाळी 8 ऐवजी सकाळी 7.06 वाजता सुटेल
 • 22907 मडगाव-हाप्पा एक्स्प्रेस ही गाडी कुडाळ येथून सकाळी 9.08 ऐवजी दुपारी 12.28 वाजता सुटेल
 • 22413 राजधानी एक्सप्रेस ही गाडी कुडाळ येथून दुपारी 12.42 ऐवजी सकाळी 11.30 वाजता सुटेल
 • 11086 डबलडेकर ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी 7 ऐवजी सकाळी 7.22 वाजता सुटेल. 22120 तेजस एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, गुरुवार, रविवार सावंतवाडी येथून सकाळी 9.08 ऐवजी दुपारी 3.28 वाजता सुटेल
 • 22149 एर्नाकुलम एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी येथून रात्री 8.20 ऐवजी रात्री 6.26 वाजता सुटेल
 • 12134 मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी कणकवली येथून रात्री 11.56 ऐवजी रात्री 8.41 वाजता सुटेल
Loading Comments