Advertisement

पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
SHARES

पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी म्हणजेच १८ नोव्हेंबरला बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.

या कालावधीत स्लो मार्गावरील सर्व लोकल बोरीवली आणि गोरेगावमध्ये फास्ट मार्गावर चालतील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत लोकल १ ते ४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर थांबणार नाहीत.


मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी १९ नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक घेण्यात येणार आहे.


कुठून कुठे असणार मेगाब्लॉक?

मेन लाईनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ठाण्यावरून सुटणाऱ्या सर्व धिम्या लोकल सकाळी १०.४८ ते दु. ४.०२ वेळेत मुलुंड आणि माटुंगामध्ये अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

तर, सीएसएमटीहून स. १०.१६ ते दु. २.५४ या वेळेत सर्व डाउन जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. कल्याणहून निघणाऱ्या अप जलद लोकल स. ११.०४ ते दु. ३.०६ वेळेत अप धीम्या लोकल नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार स्थानकात थांबणार नाहीत.


ट्रान्सहार्बरवरही असणार ब्लॉक

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत ब्लॉक चालणार आहे. ठाणे ते वाशी/नेरुळ मार्गावर स. १०.३५ ते दु. ४.०७ पर्यंत आणि वाशी/नेरुळ ते ठाणे सेवा स. १०.४५ ते दु. ४.०९ कालावधीत थांबवण्यात येणार आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा