Advertisement

शनिवारी 'परे'चा नाईट ब्लॉक, रविवारी 'मरे' हार्बरचा मेगाब्लॉक


शनिवारी 'परे'चा नाईट ब्लॉक, रविवारी 'मरे' हार्बरचा मेगाब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी शनिवारी 12 ऑगस्टच्या रात्री पश्चिम रेल्वे मार्गावर नाईटब्लॉक असणार आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, 13 आॅगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


परेचा शनिवारी नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान शनिवार, 12 आॅगस्ट रोजी रात्री नाईटब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री 11.30 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर तर रात्री 12.55 ते पहाटे 4.55 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात योतील. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक बोरिवली ते वसई रोड दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रविवारी 13 ऑगस्ट रोजी मांटुगा ते मुंलुड स्थानकादरम्यान सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुंलुड स्थानकांदरम्यानची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत. सीएसटीएम आणि दादर स्थानकातून सुटणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार असल्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिराने धावणार आहेत.


हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर रविवारी 13 ऑगस्ट रोजी सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. सीएसटीएम ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलकरता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करू शकतील.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा