Advertisement

१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं चालणार

केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं चालणार
SHARES

केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना पूर्ण १०० टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय येत्या १८ ऑक्टोबरपासून अर्थात सोमवारपासून देशभर लागू करण्यात येणार आहे.

मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, १८ ऑक्टोबरपासून विमानांमधून पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करात येणार आहे. ९ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्व विमान कंपन्यांनी मिळून एकूण २ हजार ३४० आंतरदेशीय विमानांचं उड्डाण केलं. त्यांच्या एकूण क्षमतेच्या हे प्रमाण ७१.५ टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या वर्षी जुलै महिन्यात बऱ्याच कालावधीनंतर प्रवासी विमानवाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती. १ जुलै ते ५ जुलै दरम्यान देशातील विमान कंपन्यांना ५० टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्ट या जवळपास सव्वा महिन्यात प्रवाशांची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली.

१२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये ही मर्याता ७२.५ टक्के इतकी वाढवण्यात आली होती. तर १८ सप्टेंबरपासून या महिन्यात १८ ऑक्टोबरपर्यंत ही मर्यादा ८५ टक्के इतकी नेण्यात आली आहे. अर्थात, १८ ऑक्टोबरपर्यंत देशातील विमान कंपन्यांना ८५ टक्के प्रवासी क्षमतेनं उड्डाण करता येणार आहे.



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटला

बेस्टच्या ६० इलेक्ट्रिक बसेसचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा