Advertisement

वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलवसुलीसाठीच्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ


वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलवसुलीसाठीच्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलवसुलीसाठीच्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरसीडी)वर चक्क तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे. याआधी दोनदा केवळ एकच निविदा सादर झाल्याने निविदेला तिसऱ्यांदा पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील अभियंते राहुल जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

2009 मध्ये 5.6 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सी लिंकवरून प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहनचालकांना टोल मोजावा लागतो. तर दर तीन वर्षांनी टोलवसुलीचे कंत्राट निविदा पद्धतीने दिले जाते. त्यानुसार तीन वर्षांचे टोलवसुलीचे कंत्राट लवकरच संपणार असल्याने एमएसआरडीसीने टोलवसुलीसाठी निविदा मागवल्या होत्या. 

[ हे पण वाचा - मुंबईकरांसाठी तरंगतं हॉटेल सज्ज ]

या निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने केवळ एकच निविदा सादर झाल्याने, तेही सध्या ज्या एमईपी (मुंबई एन्ट्री पाँईट लिमिटेड)कडे टोलवसुलीचे कंत्राट आहे, त्याच कंपनीकडून कंत्राट सादर झाल्याने एमएसआरडीसीने निविदेला मुदतवाढ दिली. पण त्यानंतरही एकच, एमईपीची निविदा सादर झाल्याने दुसऱ्यांदा महिन्याभराची मुदतवाढ एमएसआरडीसीने दिली. दुसऱ्या मुदतवाढीनंतरही एकच एमईपीची निविदा सादर झाली आहे. एकच निविदा सादर झाल्यास नियमाप्रमाणे मुदतवाढ देत पुन्हा निविदा मागवाव्या लागतात. 

[ हे पण वाचा - टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी ]

त्यानुसार दोन मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने एमएसआरडीसीने आता तिसऱ्यांदा मुदतवाढ, पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर एमईपीकडेच टोलवसुलीचे कंत्राट जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान सी लिंक सुरू झाल्यापासून, 2009 पासून एमईपीकडेच टोलवसुलीचे कंत्राट जात आहे. दुसऱ्या कंपन्या पुढे येत नसल्याने एमईपीच वर्षानुवर्षे सी सिंकवर टोल वसुली करत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा