Advertisement

मुंबईकरांसाठी तरंगतं हॉटेल सज्ज


SHARES

वरळी सी लिंक -  तरंगतं हॉटेल.  हे ऐकून कसलं भारी वाटतं ना. अशा पद्धतीची हॉटेल्स आपल्याला परदेशात पाहायला मिळतील. पण आता याचा अनुभव आपल्याला मुंबईतही घेता येणार आहे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या छायेत मुंबईचं पहिलंवहिलं तरंगतं एबी सेलेस्टीअल हॉटेल तयार करण्यात आलंय. शनिवारी या हॉटेलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. हॉटेलचे संचालक चेतन भिडे यांच्या दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे हॉटेल तरंगू लागलं.

थ्री टायर लक्झरी स्काय डेक सहित डायनिंग फ्लोटेल, 660 पाहुण्यांना सांभाळू शकणाऱ्या चार टायर्समधील दोन गॅलीज याच्यात आहेत. 

एबी सेलेस्टीअल ऑनलाईन बुकिंग आणि अल्पोहार आणि जेवण अशा सुविधाही देण्यात येणार आहे. या फ्लोटेलमध्ये द्वीस्तरीय मल्टी-क्युझिन 2 रेस्टोरंट,  24 तास कॉफी शॉपची सुविधा असणाऱ्या क्लब लॉंज आहे. 

चार मजली आणि पाचव्या मजल्यावर टेरेस अशी तरंगत्या हॉटेलची रचना आहे. एबी इंटरनॅशनल कन्सल्टंट्स, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी मंडळांच्या सहयोगाने हे तरंगतं हॉटेल येत्या आठवड्याभरात मुंबईकरांसाठी सज्ज होणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा