Advertisement

ऑनलाईन तिकीट बूक केल्यास सर्व्हिस टॅक्स नाही !


ऑनलाईन तिकीट बूक केल्यास सर्व्हिस टॅक्स नाही !
SHARES

मुंबई - लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी तसेच फिरायला जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या तर सोडल्या आहेत. त्याचबरोबर, 30 जूनपर्यंत ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांना सर्व्हिस टॅक्स लागणार नसल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बूक करण्याचे वाढते प्रमाण बघता तसेच डिजिटल व्यवहाराला अजून चालना मिळावी, यासाठी सरकारनं ऑनलाईन ट्रेन बुकींगला सर्व्हिस टॅक्समधून सूट दिली आहे.


ऑनलाईन तिकिटांना वाढता प्रतिसाद मिळत असला तरी लावल्या जाणाऱ्या सर्व्हिस टॅक्सबद्दल थोडी नाराजी प्रवाशीवर्गात होती. परंतु, ऐन सुट्टीच्या मोसमामध्ये सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे रेल्वे प्रवासी संघटना स्वागत करत आहे.

- शैलेश राऊत, अध्यक्ष, कसारा-कल्याण-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

आता, उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत म्हणजेच 30 जून 2017 पर्यंत ही सूट असणार आहे. आधी ऑनलाईन तिकीट बूक केल्यास 20 ते 40 रुपये सर्व्हिस टॅक्ससाठी घेण्यात येत होते. आता या नव्या निर्णयांमुळे प्रवाशांची आणखी बचत होणार आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा