Advertisement

सुपरफास्ट बुकिंग; १ मिनिटात १० हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य

केवळ १ मिनिटात एकाच वेळी १० हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे

सुपरफास्ट बुकिंग; १ मिनिटात १० हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य
SHARES

रेल्वे तिकीटांचं बुकिंग सुपरफास्ट होणार आहे. कारण आता केवळ १ मिनिटात एकाच वेळी १० हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात ७५०० तिकीटं बुक होतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल गुरूवारी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लॉन्च करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेड झाल्यानंतर तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगानं तिकीट बुक करता येणार आहे. तसंच, आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे खाण्यापिण्यासह इतर सोयी-सुविधाही मिळणार आहेत.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉरपोरेशन अर्थात आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करता येतात. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, २०१४ नंतर तिकीट बुकिंगसोबतच प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यावर भर दिला जात आहे.

'आयआरसीटीसी वेबसाईट ही रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचं पहिलं केंद्र आहे. हा अनुभव चांगला असावा. नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आता आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या दिशेनं आहे. यासाठीच आयआरसीटीसीची वेबसाईट सातत्यानं अपग्रेड करण्यासाठी आवश्यक आहे', असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचं म्हणणं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा