Advertisement

मुंबई मेट्रोने सुरू केला अनलिमिटेड ट्रिप पास, मिळेल 15 ते 20 टक्के सूट

महाराष्ट्र मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने आपल्या प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात ट्रिप पास लाँच केली आहे.

मुंबई मेट्रोने सुरू केला अनलिमिटेड ट्रिप पास, मिळेल 15 ते 20 टक्के सूट
SHARES

मुंबईत सुरू झालेली नवीन मेट्रो लाइन 7 आणि 2A लोकांसाठी खूप खास आहे. मेट्रो सुरू झाल्यामुळे एकीकडे लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे त्यांचा प्रवासही सुखकर झाला आहे. त्याची लोकप्रियता पाहून आता महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने (MMMOCL) मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी मासिक ट्रिप पास सुरू करण्यात आला आहे.

15 ते 20 टक्के सूट

मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना 'मुंबई 1' कार्ड वापरून विशेष सवलत मिळते. यानुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के आणि 60 वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 20 टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीची वैधता 30 दिवसांच्या कालावधीसाठी मर्यादित आहे. प्रीपेड स्वरूपात मुंबई 1 कार्डद्वारे शुल्क आकारले जाईल.

पास बद्दल महत्वाची माहिती

  • 45 आणि 60 ट्रिप पास खरेदीच्या तारखेपासून 30 दिवसांसाठी वैध असेल.
  • अमर्यादित ट्रिप पासची किंमत – रु. 80 (वैधता 1 दिवस), रु. 200 (वैधता 3 दिवस)

1 ट्रिप - एकेरी ट्रिप

  • मुंबई मेट्रोच्या पासनुसार, ज्यांचे नाव असेल त्या ठिकाणांदरम्यानच प्रवास मर्यादित असेल.
  • मुंबई 1 कार्ड हरवल्यास, कार्डवरील शिल्लक परत न करण्यायोग्य आहे.
  • कार्ड खराब झाल्यास, काम न केल्यास किंवा हरवल्यास, नवीन कार्डसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.
  • ट्रिप पास फक्त मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी वैध असेल.

इतकी किंमत असेल

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी 'अनलिमिटेड ट्रिप पास'ची खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, एका दिवसाच्या अमर्यादित ट्रिप पासची फी 80 रुपये असेल, तर 3 दिवसांच्या अमर्यादित ट्रिप पासची फी 200 रुपये असेल.

दुसरीकडे, जर कोणत्याही प्रवाशाला कार्ड घ्यायचे असेल तर तो मुंबई मेट्रोच्या तिकीट काउंटर आणि कस्टमर केअर काउंटरवर किमान कागदपत्रांसह घेऊन जाऊ शकतो. याशिवाय, हे कार्ड रिटेल स्टोअर्स आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते.



हेही वाचा

ठाणे महापालिका परिवहनच्या बसेस डोंबिवली आणि नवी मुंबईतही धावणार

ठाणे महापालिका डबल डेकर ई-बस चालवण्याच्या तयारीत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा