Advertisement

एनएसएसच्या विद्यार्थ्यांचं रस्ता सुरक्षा अभियान


एनएसएसच्या विद्यार्थ्यांचं रस्ता सुरक्षा अभियान
SHARES

लोअर परळ - महर्षी दयानंद महाविद्यालयातील एनएसएस युनिटच्या २० विदयार्थ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शनिवारी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं. लालबाग - भारतमाता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानात हॉर्न वाजवणं थांबवा, कारण तुमची कृती तुमची वृत्ती दर्शवते असा संदेश देण्यात आला. हॉर्नमुळे अनेकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीनं आठवड्यातून किमान दोन वेळा हे अभियान परळ पूर्व विभागातील मुख्य रस्त्यावर राबवण्यात येणार असल्याचं ग्रुप लिडर रुपेश इंगळे यांनी सांगितलंय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा