Advertisement

कॅबनंतर मुंबईत सुरू होणार 'बाईक टॅक्सी'


कॅबनंतर मुंबईत सुरू होणार 'बाईक टॅक्सी'
SHARES

ऑफिसला जायची रोजची धावपळ... त्यात कधी बस वेळेत नाही, तर कधी रिक्षावाल्यांचा लोचा. अशा परिस्थितीत मुंबईकर ओला-उबेरने जाणे पसंत करतात. ओला-उबेर आरामदायी प्रवासासाठी सोईस्कर असल्या तरी ट्राफिकमध्ये अडकले की पंचाईत होऊन जाते. त्यामानाने बाईक किंवा स्कूटीवरून मार्ग काढत सहजरित्या पुढे जाता येते. त्यामुळे हल्ली टू व्हिलरला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. 

पण टू व्हिलर घेणे सर्वांनाच परवडते असेही नाही. पण आता नॉट टू वरी. तुमच्यासाठी लवकरच मुंबईत 'ओगो बाईक सर्विस' सुरू होणार आहे. बाईक सर्विस? ही काय भानगड आहे. ओला आणि उबेर प्रमाणे आता एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी तुम्हाला बाईक किंवा स्कूटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त ओगोचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचे आहे.



बाईक सर्विस अॅप कसे असेल?

इतर कॅब सर्विसप्रमाणे तुम्हाला ओगोचे अॅप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचे करंट लोकेशन आणि तुम्हाला इच्छुक स्थळी जायचे आहे ते लोकेशन टाकायचे. तुमच्या परिसराजवळ असलेली बाईक सेवेसाठी हजर होईल. ओला, उबेरप्रमाणे चालकाचा नंबर तुम्हाला मेसेज केला जाईल. टू व्हिलर चालक तुम्हाला इच्छुक स्थळी सोडून येईल.



बाईक सर्विसची वैशिष्ट्ये

  • इतर कॅब सर्विसप्रमाणे सर्ज प्रायजिंग नसणार
  • इतर कॅब सर्विस ट्राफिक जास्त असेल तर अधिक पैसे आकारतात. पण ओगो बाईक सर्विसमध्ये असे नसेल
  • एक किलोमीटरसाठी ३ रुपये आणि एका मिनिटासाठी १ रुपये आकारले जातील
  • अॅपवर तुम्हाला चालक मेल हवा की फिमेल हे निवडण्याचा याचा पर्याय देण्यात येईल  
  • एखाद्या महिलेला फिमेल चालक हवी असेल तर हा पर्यायसुद्धा उपलब्ध असेल
  • तुमच्याकडे बाईक असेल तर ऑन द वे असणाऱ्या ओगो पॅसेंजरला तुम्ही इच्छीत स्थळी सोडू शकता
  • तो पॅसेंजर तुम्हाला कॅश पेमेंट करेल किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करेल 



३ जुलैला हे अॅप लाॅन्च करण्यात आले. गुवाहाटीपासून या बाईक सर्विसला सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत २० हजारापेक्षा जास्त अॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. राहुल शर्मा आणि पार्थ साईकिया या तरुणांची ही संकल्पना आहे. मुंबईत ही सर्विस नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा