ओला-उबेर खासगी टॅक्सी चालकांचा संप मागे

 Mumbai
ओला-उबेर खासगी टॅक्सी चालकांचा संप मागे

मुंबई - ओला आणि उबेर या कंपन्यांच्या टॅक्सीचालकांनी मंगळवारपासून करण्यात येणाऱ्या संपाचा निर्णय मागे घेतलाय. ओला -उबेर कंपनीकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप चालकांनी केला होता. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून संप करण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना याबाबत पत्राद्वारे त्यांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहेत. तर, पत्राचं उत्तर येईपर्यंत आम्ही हा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं संघर्ष टुरिस्ट चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितलं.

ओला- उबेर चालकांना कंपन्यांकडून एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात केवळ 15 ते 20 हजार रुपयेच मिळत आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणत ओला उबेर चालकांच्या तिन्ही संघटनांनी एकत्रित येऊन आझाद मैदानात निदर्शन केली. पण, त्या संघटनांमध्येही विविध कारणांमुळे वाद निर्माण झाल्याने तिथेही चालकांची संख्या कमी झाली. त्यामुळे बेमूदत संप मागे घेण्याचे हे देखील कारण असू शकते अशी चर्चा आहे.

Loading Comments