SHARE

शनिवारपासून सुरु असलेल्या पावसानं मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली आहे. बुधवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी मंगळवारी झालेल्या पावसामुळे रुळांवर साचलेले काही भागातील पाणी अजूनही पुर्णपणे ओसरलं नाही. त्यामुळे बुधवारीही पश्चिम रेल्वेच्या तब्बल १३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.  तर ४० लोकल या उशीराने सुरु होत्या.


रुळांवर अद्याप पाणी

 मंगळवारी विरार, वसई, नालासोपाऱ्याचा परीसर पाण्याखाली गेल्याने भाईंदरपासून विरारपर्यंतची लोकल सेवा बंद करावी लागली. तर पश्चिम अाणि मध्य रेल्वेच्या ३२२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तसंच पश्चिम रेल्वेच्या ५० लोकल उशिरा धावत होत्या. याशिवाय ५ एक्स्प्रेस गाड्यांचेही मार्ग बदलले होते. मात्र, बुधवारीही मध्य अाणि पश्चिम रेल्वेच्या लोकल उशिरा धावत होत्या. पश्चिम रेल्वेच्या मार्गातील काही ठिकाणी रुळांवरील पाणी अद्याप कमी झालेलं नाही. त्यामुळं १३० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.हेही वाचा -

एसटीची 'शयनयान' लवकरच प्रवाशांच्या सेवेत

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या