Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनात दीड हजार रुपयांची नाणी


बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनात दीड हजार रुपयांची नाणी
SHARES

बेस्ट प्रशासनानं प्रवाशांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेत बेस्ट बसच्या तिकीट भाड्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सध्या बसच्या प्रवासासाठी ५ रुपये व वातानुकूलित बसच्या प्रवासासाठी ६ असं भाडं ठरवण्यात आलं होतं. परंतु, बेस्टच्या या निर्णयनंतर बेस्ट प्रशासनाकडं मोठ्या प्रमाणात सुट्टे पैसे जमा झाले आहेत. परिणामी बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनात दीड हजार रुपयांची नाणी, तर १२ हजार रुपयांची रक्कम ही नोटांच्या स्वरुपात देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. 

यासंदर्भात सोमवारी परिपत्रक काढण्यात आले. ऊर्वरित वेतन बँक खात्यात जमा होणार आहे. १५ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनातील ही रक्कम देण्यात येणार आहे. भाडेकपातीनंतर बेस्टचे तिकीट दर पाच किलोमीटरसाठी ५ रुपये झाले. टाळेबंदीआधी बेस्टकडे मोठ्या प्रमाणात नाणी जमा होत होती. यामुळे बेस्ट प्रशासनाने गेल्या काही महिन्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक रक्कम नाण्याच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दर महिन्याला काही ठराविक रक्कम ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांमध्ये दिली जाते. मार्चपासून प्रवासी कमी झाले. मात्र आता प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती १६ लाखांपर्यंत पोहोचली. बेस्टकडे पुन्हा मोठ्या प्रमाणात नाणी जमा होऊ लागली आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा