Advertisement

'बेस्ट'च्या ताफ्यात १५० दुमजली बसगाड्या

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० दुमजली बस (डबल डेकर) येणार आहेत.

'बेस्ट'च्या ताफ्यात १५० दुमजली बसगाड्या
SHARES

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० दुमजली बस (डबल डेकर) येणार आहेत. सध्या असलेल्या १२० पैकी ७० बसचे आयुर्मान पूर्ण होत असल्यानं टप्प्याटप्यात त्या भंगारात काढल्या जात आहेत. परंतु, त्यानंतरही सेवेत राहणाऱ्या ५० बस आणि येणाऱ्या नविन १०० बसमुळं दुमजलीचा एकूण ताफा १५० पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्ट उपक्रमाच्या दुमजली बसगाड्या बसमुळं प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढते आणि गर्दीतला प्रवासही सुकर होतो. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या १२० दुमजली बसचं आयुर्मान संपल्यानं त्या कालबाह्य होणार, अशी माहिती समोर येत होती. यातील ७० बसचेच आयुर्मान पूर्ण होत असून, त्या टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळं दुमजली जुन्या ५० बसच राहणार असून त्यांचे, आयुर्मान संपण्यास आणखी ३ ते ४ वर्ष आहेत.

आयुर्मान संपुष्टात आलेल्या दुमजली बसऐवजी नवीन १०० दुमजली बस घेण्याचा निर्णय नुकताच बेस्ट उपक्रमानं घेतल्याचं स्पष्ट केलं. या निविदा प्रक्रिया सुरू असून ४ महिन्यांत त्या टप्प्याटप्यात दाखल करण्याचं उद्दिष्ट असल्याचं समजतं. १०० नव्या व जुन्या राहिलेल्या ५० बसगाड्यांमुळं ही संख्या १५० होत आहे.

अत्याधुनिक सुविधा

  • भारत-६ श्रेणीतील या बसमध्ये स्वयंचलित गिअर
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्येच इलेक्ट्रॉनिक बोर्ड
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था

पर्यावरणस्नेही आणि वातानुकूलित २६ विद्युत बस शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता नरीमन पॉईट इथं होणार आहे. यापूर्वी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विजेवरील स्वत:च्या मालकीच्या ६ आणि भाडेतत्त्वावरील ४० अशा एकूण ४६ बसगाड्या दाखल करण्यात आल्या आहेत. आता २६ मिडी बसही ताफ्यात असतील. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०० हून अधिक बस दाखल केल्या जातील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा