Advertisement

तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टा डोम कोच जोडला जाणार

15 नोव्हेंबरपासून पासून आणखी एक व्हिस्टा डोम कोच तेजस एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे.

तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टा डोम कोच जोडला जाणार
SHARES

15 नोव्हेंबरपासून पासून आणखी एक व्हिस्टा डोम कोच तेजस एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. १५ नोव्हेंबरपासून एकूण 15 LHB कोचच्या सुधारित रचनेसह ट्रेन धावेल. AC चेअर कार-11 कोच, एक्झिक्युटिव्ह चेअर कार-01 कोच, व्हिस्टा डोम-01 कोच, जनरेटर कार-02 अशी रचना असेल.

दरम्यान, ट्रेन क्रमांक 22119/22120 मुंबई CSMT-करमाळी-मुंबई CSMT, 'तेजस' एक्स्प्रेसची सेवा मडगाव जंक्शनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 22119/22120 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी 'तेजस' एक्सप्रेस :

ट्रेन क्रमांक 22119 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन 'तेजस' एक्सप्रेस दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे 5.50 वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला त्याच दिवशी 2.40  वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 22120-मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी 'तेजस' एक्स्प्रेस मडगाव जंक्शन येथून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी 3.15 वाजता सुटेल. ही गाडी मुंबई सीएसएमटी येथे त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी स्थानकावर थांबेल.हेही वाचा

मुंबईहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या अपघातात ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

चर्नी रोडचा नवीन रेल्वे ब्रिज प्रवाशांसाठी खुला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा