उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग?

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरचं घर बसल्या बसमधील सीटचं बुकींग करता येणार आहे. उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग करता येणार आहे.

SHARE

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरचं घर बसल्या बसमधील सीटचं बुकींग करता येणार आहे. उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग करता येणार आहे. यासाठी उबरनं बेस्ट प्रशासनाशी संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे. बसचं प्री-बुकींग तिकीटची किंमत ही साधारण तिकीट दरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत बेस्ट प्रशासन आणि उबर याच्यात चर्चा झालेली नसून, चर्चा झाल्यावरच यासंदर्भात आणखी माहिती मिळणार आहे

सुविधेत वाढ

महापालिका बेस्टच्या सुविधेत वाढ करण्याचं ठरवत आहे. उबेर व्यतिरिक्त, बेस्ट प्रशासन अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना रिअल टाइम अपडेट देण्यासाठी योजना बनवत आहे. त्याशिवाय, बेस्ट आपल्या ताफ्यात एसी बस दाखल करण्याव्यतिरिक्त प्रवाशांना इतर सुविधा देण्याची शक्यता आहे.

१०० कोटी रुपये

बेस्ट प्रशासन देखील प्रवाशांसाठी एक अॅप बनवत आहेत. या अॅपद्वारे प्रवाशांना बस थांब्यावर येणाऱ्या बसबाबत माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणं, महापालिकेनं बेस्टसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार पालिकेतर्फे बेस्टला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.हेही वाचा -

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या

उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग?
00:00
00:00