Advertisement

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

राज्य मंडळानं दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर ९ दिवसांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केलं आहे. बुधवारी विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
SHARES

राज्य मंडळानं दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर ९ दिवसांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केलं आहे. बुधवारी विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. त्याशिवाय विद्याथ्यार्नी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स आणि एमसीव्हीसीसाठी अर्जाचा पहिला भाग भरला नाही, त्यांनाही तो भरता येणार आहे. बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी २५ जून रोजी, तर साधारण गुणवत्ता १ जुलै आणि पहिली गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचं वेळापत्रक उपसंचालक कार्यालयाकडून त्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कनिष्ठ आणि नामांकित महाविद्यालयांतील ७० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महाविद्यालये अकरावीचे नियमित वर्ग सुरू करू शकतात, तसेच एकत्र वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची असेल, असंही स्पष्ट करण्यात आले.

वेळापत्रकामध्ये कनिष्ठ महाविद्यालयं त्यांच्याकडील व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील जागा केव्हाही समर्पित करू शकतात, तर अल्पसंख्यांक महाविद्यालयं त्यांचा अल्पसंख्यांक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर समर्पित करू शकणार आहेत.


११वी प्रवेशाचे वेळापत्रक

  • १९ ते २३ जून, २०१९ - बायफोकल प्रवेश: अर्ज, पसंतीक्रम भरणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचेही अर्ज भरणे.
  • महाविद्यालयांनी कोट्यातील प्रवेश पूर्ण करणे.
  • बायफोकल वगळता इतर शाखांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे
  • १९ ते २९ जून, २०१९ - सायंकाळी ५ वाजेपर्यंत - सर्व शाखा आणि बायफोकल यामध्ये भाग १ आणि भाग २ अर्ज भरणे.
  • २५ जून, २०१९- ६ वाजता - बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.
  • २६ आणि २७ जून, २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - बायफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील आॅनलाइन प्रवेश घेणे
  • १ जुलै, २०१९- सकाळी ११ वाजता - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.
  • २ ते ३ जुलै २०१९- सकाळी १० ते सायंकाळी ५ - अर्जाची पुनर्तपासणी करणे आणि हकरती नोंदविणे.
  • ६ जुलै, २०१९ - सकाळी ११ - पहिली गुणवत्ता यादी.
  • ८ जुलै ते ९ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • १० जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • १० जुलै, २०१९ - ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील.
  • ११ आणि १२ जुलै २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - अर्जाचा भाग भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध
  • १५ जुलै, २०१९ - संध्याकाळी ६ - दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  • १६ जुलै, १७ जुलै, २०१९- सकाळी ११ ते सायंकाळी ५ - दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • १८ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • १८ जुलै, २०१९ - ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.
  • १९ ते २० जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ५ पर्यंत - अर्जाचा भाग - १ आणि भाग २ भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.
  • २३ जुलै, २०१९- संध्याकाळी ६ - तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  • २४ जुलै आणि २५ जुलै, २०१९- सकाळी ११ ते सायंकाळी ५ - तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • २६ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • २६ जुलै, २०१९ - संध्याकाळी ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि दुसºया फेरीचा कटआॅफ जाहीर करणे.
  • २७ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ५ - अजार्चा भाग - आणि भाग २ भरण्यासाठी दुसºया भागातील दुरुस्तीसाठी उपलब्ध.
  • ३१ जुलै, २०१९- संध्याकाळी ६ वाजता - विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  • १ आणि २ आॅगस्ट, २०१९ - सकाळी ११ ते ५ पर्यंत - विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश.
  • ३ आॅगस्ट, २०१९ - सकाळी १० - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.



हेही वाचा -

पावसाळ्यानंतर पुलांसह अन्य कामं करावीत, मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे रेल्वे प्रशासनाला पत्र

'ईव्हीएमचा वापर बंद करा, नाही तर महाराष्ट्र बंद करू', वंचित बहुजन आघाडीचा इशारा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा