प्रवाशांसाठी लवकरच ओशिवरा रेल्वे स्थानक

 Goregaon
प्रवाशांसाठी लवकरच ओशिवरा रेल्वे स्थानक
प्रवाशांसाठी लवकरच ओशिवरा रेल्वे स्थानक
See all

गोरेगाव - ओशिवरा रेल्वे स्थानक डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणाराय. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका कार्यक्रमात दिली.

महापालिकेनं घास बाजार-जयकोच मार्गावरील अडथळे (बांधकामं) एक महिन्यात हटवून पन्नास मीटर्स रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येईल. रेल्वे स्टेशनवरती तिकीट घर, पंखे, स्वच्छतागृह यासारखी कामं तसंच जोगेश्‍वरी-अंधेरीदरम्यान निवासी गाळ्यांचं स्थलांतर लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली.

Loading Comments