Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा
SHARES

मुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे.

कोणतीही लोकल जलद मार्गावरुन चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आलेली नाही. याचाच परिणाम स्लो मार्गावरील वाहतूकीवर झाल्याचंही दिसून येत आहे. कारण जलद मार्गावरील काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा