Advertisement

पनवेल-पेण रेल्वे सेवा लवकरच सुरू


पनवेल-पेण रेल्वे सेवा लवकरच सुरू
SHARES

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते पेण ही लोकल ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार अाहे. पनवेल-पेण मार्गावर विद्युतीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं अाहे. इलेक्ट्रिक लोको डब्ल्यूसीएजीची चाचणीही या मार्गावर यशस्वी झाली अाहे.

मंजुरीची प्रतिक्षा

मध्य विभागाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर या लोकलचा मार्ग मोकळा होईल. पनवेल-पेण मार्गावर विद्युतीकरण झालेल्या ठिकाणचं मुंबई विभागाकडून लवकरच परिक्षण केलं जाणार अाहे. मध्य रेल्वेच्या पनवेल-रोहा मार्गावर पेण रेल्वे स्थानक अाहे. छत्रपति शिवाजी टर्मिनसपासून दिवा जंक्शनमार्गे हे अंतर १०३.५९ किलोमीटर अाहे. पनवेल-पेण मार्ग सुरू झाल्यास अलिबाग या पर्यटनस्थळी जाणं अाणखी सोपं होणार अाहे. अलिबागला जाण्यासाठी वेळही वाचणार अाहे. तसंच प्रवासही सुलभ होणार अाहे. हेही वाचा - 

रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ

सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा