Advertisement

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
SHARES

तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता ते गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

प्रवास करण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा. परशुराम घाट आजपासून कामासाठी बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजपासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

ऐन पावसाळ्यात वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी घाटाचा कट केलेला भाग फोडून घाट बंद करण्याची मागणी ठेकेदाराने केली होती. घाटातील काम सुरळीत व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने घाट १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परशुराम घाट बंद केल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक पुढील १५ दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक अंबुसमार्गे लोटेकडे वळवण्यात आली असून गोव्याकडून येणारी वाहतूक अंबुसमार्गे लोटे मार्गे कळंबस्तेकडे वळवण्यात आली आहे.

घाटावरील काम आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना जाम त्रास सहन करावा लागत आहे. 



हेही वाचा

ठाण्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा