Advertisement

अर्धवातानुकूलित लोकल प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांची मान्यता

प्रवाशांचं एसी लोकलबाबत असलेलं मत जाणून घेण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षण घेण्यात आलं.

अर्धवातानुकूलित लोकल प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांची मान्यता
SHARES

मुंबई लोकलनं (mumbai local train ) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंडगार व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल सेवा सुरू केली. परंतू, या एसी लोकलची तिकीट अधिक असल्यानं प्रवाशांनी या लोकलला अत्यल्प प्रतिसाद दिला. त्यामुळं प्रवाशांचं एसी लोकलबाबत असलेलं मत जाणून घेण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षण घेण्यात आलं. त्यानुसार, बहुसंख्य प्रवाशांनी एसी लोकल प्रवासाला पसंती दाखविली असून, सुमारे ४० टक्के प्रवाशांनी १२ पैकी ३ डब्बे एसी असावे, तर ३० टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी किमान ६ डब्बे एसी असावे, असे मत व्यक्त केल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत ३७ हजार प्रवाशांनी आपली मते नोंदविल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल धावली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरही एसी लोकल धावली. परंतु तिन्ही मार्गावरील लोकल गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्वभूमीवर जून २०२१ पासून प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

या सर्वेक्षणात ३७ हजार ८२ जण सहभागी झाले आणि त्यांनी आपली मतं नोंदविली. अंदाजानुसार रेल्वेला फार कमी प्रतिसाद  मिळाला. सर्वेक्षणात मध्य रेल्वेवरील ११ हजार ७४३, तर पश्चिम रेल्वेवरील २५ हजार ३३९ प्रवाशांची मते जाणून घेण्यात आली. एसी लोकल का हवी, प्रवाशांना संपूर्ण एसी लोकल हवी की अर्धवातानुकूलित लोकल, असे विचारतानाच १२ डब्यांमध्ये किती डबे एसी हवे, तसंच एसी लोकलच्या भाडेदरात सुधारणा आवश्यक आहे का, असे अनेक प्रश्न विचारले होते. प्रवाशांचा कल अर्धवातानुकूलित लोकलकडं असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले. 

सर्वेक्षण

  • ४० टक्के प्रवाशांनी १२ डबा लोकलमधील ३ डबे एसी आणि ९ डबे विनावातानुकूलित करावे, असे मत नोंदवले आहे. 
  • ३० टक्के प्रवाशांनी १५ डबा लोकलपैकी ६ डबे एसी आणि ९ डबे सामान्य हवे, अशी सूचना केली आहे. १२ डबा लोकलमध्ये प्रत्येकी ६ डबेही एसी करण्यास सांगितलं.
  • ८० टक्के लोकल प्रवासी एसी लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देण्यास तयार आहेत.
  • खासगी वातानुकूलित बस, टॅक्सी किंवा वैयक्तिक वाहनांपेक्षा ६५ टक्के लोकांनी एसी लोकलमधून प्रवासाला पसंती दिली आहे.



हेही वाचा -

राज्याला ड्रायव्हर नको, जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवाय- नारायण राणे

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा